भावगंगा - लाभली अनुपम वाणी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
लाभली अनुपम वाणी तुला
वाही रे चरणी प्रभुच्या तिला ॥धृ॥
अनुभव आठव प्रभु प्रीतीचे
त्यात रंगवी चित्र भक्तीचे
नीतिच्या तोडु नको शृंखला ॥१॥
वद भावाने प्रभुला ‘आई’
आश्वासक अन्यांचा होई
उद्धरी दीन धरतिच्या मुलां ॥२॥
अविश्रान्त तू वदता मंगल
जळेल अविचारांचे जंगल
पाहसी पुढती हरि ठाकला ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP