भावगंगा - उघड गे मुक्ताई डोळे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
समाधीतुनी जागे करण्या स्वाध्यायी आले
उघड गे मुक्ताई डोळे ॥धृ॥
वर्षे गेली सात शतांची
व्यंकटी न सांडली जनांची
तूच लावुनी ताटी बसलिस, आम्ही ओळखले ॥१॥
स्वधर्म सूर्या कुणि न देखिले
दुरितांचे ना तिमिर आटले
जो जे वांछिल खळा लाभले, तुला न पाहवले ॥२॥
संसार सुखाचा कुणाचा न झाला
आनंदे न भरला तिन्ही लोक
तुझ्या व्यथांची दारे लावुन, लोचन तू मिटले ॥३॥
विश्व झालिया रागे वन्ही
स्वाध्यायी हे झाले पाणी
ज्ञानेशाचे पसाय लोणी, वाटत हे फिरले ॥४॥
नामा, नरहरी, आले चोखा
आले गोवा, आले ओखा
पांडुरंग ह्या नगरी येता, जीवन रसरसले ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP