मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
कृष्णाची गीता म्हणजे वेदांचे सार

भावगंगा - कृष्णाची गीता म्हणजे वेदांचे सार

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


कृष्णाची गीता म्हणजे वेदांचे सार हो
दादा आम्हाला हाय ह्योच आधार
विश्वाला देण्यासाठी एकच विचार हो
दादा आम्हाला हाय ह्योच आधार ॥धृ॥
आदिवासी गिरीवासी आले आले वनवासी
जमलीया संगत बघा कशी खाशी
आली सगळ्याच्या विचारांना धार हो ॥१॥
सागरपुत्र भूमीपुत्र जागे झाले देवीपुत्र
संस्कृतीच्या कामासाठी झिजविती क्षेत्र
आता तरुन जाणार हाय भवसागर हो ॥२॥
हातात गीता आणि हृदयात राम
सर्वांनी करुया प्रभूचे काम
पांडुरंगावर टाकलाय भार हो ॥३॥
आता बदलून जाणार हाय जग हे सारं हो
दादा आम्हाला --- कृष्णाची गीता --- दादा आम्हाला
भक्तीफेरीचं सुटलंय वारं हो
दादा आम्हाला हाय --- कृष्णाची गीता --- दादा आम्हाला

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP