भावगंगा - युद्ध करू, घनघोर लढू
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
युद्ध करू, घनघोर लढू, पण युद्ध करू
वणव्यातुन त्या पुन्हा उगवती वैचारिक नव भावतरू ॥धृ॥
विकार येती पहिले पुढती
करील संयम त्यांची माती
त्या मातीचा टिळा लावुनी पढली, पुढली वाट धरू ॥१॥
कुणी गुणांचे कौतुक करिती
फितुरीचा बलि सजवित फिरती
त्या मोहाला टाकुन पकडू, ऐक्याचा अविचल मेरू ॥२॥
तत्त्वाच्या गर्भात वाढती
मानव्याच्या श्रेष्ठ विभूती
रक्षण त्यांचे करण्यासाठी छातीचा दृढ कोट करू ॥३॥
प्रश्र्न नको; हे कोण शिकवितो
कुठे राहतो, कधी भेटतो
स्वाध्यायाच्या वाटेवरती आश्रम हे आहेत सुरू ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP