मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
सुचारु सुंदर

भावगंगा - सुचारु सुंदर

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


सुचारु सुंदर एकच नाम
सीताराम राधेश्याम
पातक नाशक पावक नाम
सीताराम राधेश्याम ॥धृ॥
जन्म सकल पापाने भरले
भवसागरिं तरि तूच तिरले
तारक धारक एकच नाम
सीताराम राधेश्याम ॥१॥
काम क्रोध मद मत्सर सुटता
माया-ममता-बंधन तुटता
मग मंगल गवसे ते नाम
सीताराम राधेश्याम ॥२॥
तारक जगता पतितपावना
तम अंतरिंचा हरि शुभवदना
भक्तांचे तू एकच धाम
सीताराम राधेश्याम ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP