भावगंगा - योगेश्वराची बाळे हुशार
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
एक दोन तीन चार, योगेश्वराची बाळे हुशार ॥धृ॥
उठुनि सकाळी देव पूजितो
भाव-भक्तिने त्याला भजतो
करतो त्याचा जयजयकार
योगेश्वराची बाळे हुशार ॥१॥
मंदिरात नेमाने जमतो
चित्त देउनी ऐकत बसतो
प्रेरक गीतेचे सुविचार
योगेश्वराची बाळे हुशार ॥२॥
व्रत आचरतो भक्तिफेरिचे
काम स्वल्प ते भगवंताचे
गोड बोलतो सहजोद्गार
योगेश्वराची बाळे हुशार ॥३॥
ॠषि-संतांची वाट चालतो
चराचरातिल देव वर्णितो
जाणुनि त्याचा बृहदाकार
योगेश्वराची बाळे हुशार ॥४॥
जागृत करतो मानव दानव
शोधुनि देतो दडला दानव
संस्कृती सांगत विविधाकार
योगेश्वराची बाळे हुशार ॥५॥
सुटली सहजच हीन याचना
कर्तृत्वाला आली चेतना
झाला अंतरि प्रभु साकार
योगेश्वराची बाळे हुशार ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP