भावगंगा - निश्चय करुया आज
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
निश्चय करुया आज तरुण हो
निश्चय करुया आज ॥धृ॥
जिद्दीने काळाशी लढू
परिस्थितीवर तुटून पडू
प्रारब्धावर स्वार होऊनि, प्रयत्न करुया आज ॥१॥
उभा ठाकला शत्रू पुढे
बलिदानाचे लिहू धडे
इतिहासाची स्मृती ठेऊनि, मरण पत्करू आज ॥२॥
कुविचारांवर स्वारी करू
सुविचारांचा ध्वज उभारू
गड सर करूनि जन हृदयाचा, सुराज्य करुया आज ॥३॥
अढळ जगी या ध्रुव तारा
उलट वाहती जलधारा
प्रवाहाशी त्या टक्कर देऊनि, सज्ज होऊ या आज ॥४॥
तरुण जाहले मृत जीवनी
गीता देईल संजीवनी
सख्यत्वाचे नाते बांधुनी, ध्येय करू साकार ॥५॥
धर्मासाठी नित्य झरू
'पांडुरंग' पाईक ठरू
संस्कृतिसाठी रक्त आटवून, नाते दृढ करू आज ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 07, 2023
TOP