मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
तरुण ! तू तरुण रहा

भावगंगा - तरुण ! तू तरुण रहा

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


प्रभु ठेवी तुझ्यावर आशा तरुण ! तू तरुण रहा ॥धृ॥
घे गीता हातात, श्रद्धा तू वाढवून
रूप, रंग, आकार, सगळेच पालटून
प्रभू चरणी वाहून वाहून त्या श्रद्धेला
तरुण ! तू तरुण रहा ॥१॥
बुद्धी ना गुलाम मानस ना भयभीत
चिन्ता स्वत:ची नि खोटी ना लाज, रीत
जरी लहान तरी तू प्रभूचा
तरुण ! तू तरुण रहा ॥२॥
‘मान्यवंत मोठा मी’ वदसी जगामधी
वदसी ते नसते आचरणी कधी
वेद, गीता घेऊन जा जनात
तरुण ! तू तरुण रहा ॥३॥
तत्त्व जाणून शोध शास्त्रांची खोली
उकल विश्वाची जी पूर्वजां न कळली
भाव, भक्ती पेरीत जा अमाप
तरुण ! तू तरुण रहा ॥४॥
नित्याचा नाच तुझा देतो समाधान
ताल नाही त्याला जीव त्याने होई हैराण
तुझ्या तालावर नाचव जगाला
तरुण ! तू तरुण रहा ॥५॥
नाटक-सिनेमाचा शोक असू दे रे
अंध आचरण त्याचे नको रे
रचोत नाटक तुझ्या जीवनावर
तरुण ! तू तरुण रहा ॥६॥
उधळण रंगाची करिसी हौसेने
मन रंगवत का नाहीस भक्तीच्या रंगाने
पांडुरंगाने भर जग सारे
तरुण ! तू तरुण रहा ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP