भावगंगा - जीव जीव सुखी राख
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जीव जीव सुखी राख धरी प्रेम देवा
करू तुझे काम, अवघा तूच बा विसावा ॥धृ॥
गाऊ तुझे नाम, सांगू गाव वहिवाट
तुझ्या कीर्तीचे पोवाडे, वर्णू गुण, थाट
आनंदित जगताचा आनंद उरावा
प्रेमभाव तुझा त्यांत मोगरा फुलावा ॥१॥
पहावया तृप्त बाळ माय पाजी पान्हा
गोड शब्द ऐकावया न्याहाळीत तान्हा
तीच दृष्टी आम्हावरी अमोलिक ठेवा
पाखर कृपेची देवा! आधार असावा ॥२॥
त्राण देई पायीं, वाचा बोलू दे मंजुळ
होवो नामाचा गजर प्रेमाचा कल्लोळ
जीव जीव रंगत रंगी शिवरूप व्हावा
एक आनंद भरावा प्रियतम नेवा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP