भावगंगा - असावे मंदिर अपुले छान
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
असावे मंदिर अपुले छान
नाव तयाचे अमृतालयम्
सत्य शिवाचे रूप सुंदरम्
गावापासुन जवळ असावे दूर नसावे स्थान ॥धृ॥
कुदळ फावडी आदि साधने
भाव पुजेची ही उपकरणे
श्रमभक्तीला कौशल्याची कधि न पडावी वाण ॥१॥
मूर्ती, कळस वा घुमट नसावा
प्रतिमारूपे देव वसावा
वैष्णवास त्या दुरुन दिसावे हिरवे छप्पर छान ॥२॥
जात, पात ना; गाव पुजारी
हवे कशाला पदाधिकारी?
झाडझूड जो करील त्याला घडेल संध्या-स्नान ॥३॥
बाग फुलांची सुगंध उधळिल
भूपाळी शहनाई आळविल
फुलपाखरे वनीं विहरतिल गात प्रभूचे गान ॥४॥
बाळ, तरुण हे खेळ खेळतिल
माता, भगिनी भजने गातिल
काठी टेकित वृद्धही येतिल करण्या अमृतपान ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP