भावगंगा - एकच साद एकच नाद
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
एकच साद एकच नाद
आहे अमुचा ईश्वरवाद ॥धृ॥
प्रणाम करतो जगदीशाला
बाहूमधल्या कर्तृत्वाला
ज्ञान भक्ति कर्म श्री पाद
आहे अमुचा ईश्वरवाद ॥१॥
गुह्यशास्त्र गीतेला गणतो
वेदांचा सिद्धान्त मानतो
उपनिषदांचा चिन्तनवाद
आहे अमुचा ईश्वरवाद ॥२॥
मानवतेचे मूल्य रक्षितो
नीतीला आचार जोडतो
सद्गुण करिती घंटानाद
आहे अमुचा ईश्वरवाद ॥३॥
घराघरामधि देव वसवितो
सैतानाला दूर पळवितो
करितो प्रेमळ सुख-संवाद
आहे अमुचा ईश्वरवाद ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP