मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
करिसी तू हा एक विचार

भावगंगा - करिसी तू हा एक विचार

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


करिसी तू हा एक विचार जन्म-मरण हे कधि टळणार
विरतिल सारे विषय-विकार क्रान्ती होईल अपरंपार ॥धृ॥
‘मी-मी’, ‘माझे-माझे’ करुनी
गुरफटला मानव अज्ञानी
इतरांस्तव हा अल्प विचार
क्रान्ती होईल अपरंपार ॥१॥
भोग भोगता दु:खचि होई
अनुभव हा सर्वांना येई
भोगातच जरि त्याग-विचार
क्रान्ती होईल अपरंपार ॥२॥
क्षणभर व्यर्थचि जातो आहे
प्रभुकार्याविण सार्थक नोहे
प्रभुसैनिक जरि तू होणार
क्रान्ती होईल अपरंपार ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP