भावगंगा - अमृताची गोडी येते
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
अमृताची गोडी येते अमृतालयाने गावीं
होळी होतो भेदभाव कळे सद्गुण-थोरवी ॥धृ॥
हृदयात वाढे भक्ती, घराघरामध्ये प्रेम
परिवार आनंदतो जाणून आतला राम
बने जीवन विश्वास, आशा गौरवाचे स्थान
भय-भीती पळे सारे, विचाराला वाव छान ॥१॥
ओढ लागे देवत्वाची ॠषी-मुनींच्या ज्ञानाची
पूर्वजांच्या विकासाची, पावित्र्याची, सुकृतीची
सहकार मोठा वाटे, मत्सराचे उच्चाटन
नीती-रीतीची जाणीव स्वीकारी सहज मन ॥२॥
भक्तीच्या भावात आहे यक्षिणीचे परिवर्तन
मानव्याची नीतीमूल्यें राखी हिचे महिमान
योगेश्वर संगे राही, छाया-सावलीसारखा
गाय, पक्षिणी, माऊली नाते जोडी कृष्णसखा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP