भावगंगा - फिरतसे स्वाध्यायी डोंगरीं
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
स्वत:ची घेउनिया भाकरी, फिरतसे स्वाध्यायी डोंगरीं ॥धृ॥
इच्छा नाही कधि मानाची; खंतही नाही कमीपणाची
पर्वा नाही कधि कष्टाची; चालतो, ध्येय घेऊनी उरीं ॥१॥
कुणाजवळ ना कधी मागणे; दिले तरी ते कदा न घेणे
घरोघरी जावूनि, बसोनी त्रिकालसंध्या करी ॥२॥
मार्गामधले काटे, पत्थर, फुलाहुनी मऊ भासे भूस्तर
आग ओकितो माथी भास्कर, फिकिर तो त्याची कधी ना करी ॥३॥
स्तुती करा वा कुणीहि निंदा; स्वाध्यायाचा फिरतो बंदा
देव घ्या फुका एकच धंदा, संसारीं तो जरी ॥४॥
कार्य प्रभूचे करित रहाणे, ठावे नाही मागे मागे फिरणे
ध्येय तसे ना कदा सोडणे, बांधिले भक्ती-कंकण करीं ॥५॥
ध्यास एकला प्रभु-कार्याचा, संकल्पही जनीं तोच मनाचा
फिरतो सेवक योगेशाचा, घेउनी माणुसकी अंतरी ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP