भावगंगा - यज्ञ
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
ह्या अग्नीतुन, ह्या तेजातुन निर्मलता दे साद
लाडक्या ! ऐक, ऐक पडसाद ॥धृ॥
मशाल कधि तू करसि खालती
ज्वाला परि त्या वर वर जाती
उन्नयनाची रीत सांगती, नको घालु तू वाद ॥१॥
जगण्याच्या आशेतुन गळते
पाप, प्रदूषण जगभर फिरते
अग्निहोत्र चालू असले तर जळतो त्यांचा माद ॥२॥
तेजावाचुन जीवन नाही
उबेत फुलते प्रियतम लाही
अग्नि राखतो जिवंत सृष्टी आणिक आशावाद ॥३॥
ध्येयासाठी अग्नीपूजन,
प्रेमासाठी अग्नीपूजन,
मैत्रीसाठी अग्नीपूजन; नाही कुठे अपवाद ॥४॥
ॠषी-मुनींच्या दिव्य दृष्टिने
आत्मीयतेच्या दृढ भावाने
नाव लाभले मंगल अग्निस यज्ञ, सुख-संवाद ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP