भावगंगा - घरीं आला माझ्या गोविंद
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
वेडा होऊनि नाचे आनंद
घरीं आला माझ्या गोविंद ॥धृ॥
जय मुकुंद मुरारि बोला
खेळे गोविंद गोपाळ-काला
नाचती सौंगडी धुंद
घरीं आला माझ्या गोविंद ॥१॥
झळकती गुढ्या तोरणे
सजविली पहा अंगणे
कोंदला मनीं स्वच्छंद
घरीं आला माझ्या गोविंद ॥२॥
फोडू हंड्या, लुटू दहिलोणी
आनंद नाचे, गाई गाणी
लागे कृष्ण-कृष्ण मज छंद
घरीं आला माझ्या गोविंद ॥३॥
हरपला दुरावा माझा
गवसला जोगियांचा राजा
चराचरात आनंदकंद
घरीं आला माझ्या गोविंद ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP