भावगंगा - करुणामय भगवान
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
स्वाध्यायी रे! नको बावरू, करुणामय भगवान
त्याचे तेच खरे महिमान ॥धृ॥
शोधित फिरतो भक्त आपुला
प्रीतीने कवळी दृढ त्याला
त्याच्या कृतिला तप तो म्हणतो
करतो करुणा-दान ॥१॥
समज आणतो मनात दडली
कृतिभक्तीची ठीक साउली
चिन्तन कळते त्याला सगळे
कोण साधु हैवान ॥२॥
तारेवर त्याच्या मायेच्या
नाच जिवांचा, वदते वाचा
जरा करिल जर बंद ढोलकी
उडेल त्याचा प्राण ॥३॥
चिंतेच्या भरल्या डोळ्यांनी
सुटति न कोडीं अथवा गुंफणी
त्याच्या नजरेच्या तालावर
काळ मांडी थैमान ॥४॥
नको मागु कधि भीग कुणाशी
बसते चिकटुन जी जीवनाशी
करी प्रार्थना, नको अर्थना
सुचेल पुढचे स्थान ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP