भावगंगा - खेळायचं हाय आज खेळायचं हाय
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
खेळायचं हाय आज खेळायचं हाय
गल्लीबोळात आज खेळायचं हाय ॥धृ॥
दादा ताई या या, मुन्ना मुन्नी या या
अमीर समीर अब्दुल रहिम खेळांत आमुच्या या या
हसू खेळू या या, खेळायचं हाय आज… ॥१॥
आट्यापाट्या खेळू या, लंगडी धावकी खेळू या
आबादुबी खेळू या, लपाछपी खेळू या
गम्मत जम्मत करू या, खेळायचं हाय आज… ॥२॥
चेंडू लागता खिडकीला, काचा फुटतिल खळाखळा
आरडा ओरड होता अमुची, झोपा उडतिल कितिकांच्या
तरी जपून आपण खेळू या, खेळायचं हाय आज…॥३॥
आई आणि बाबा तुम्ही घरात नेऊ नका कुणी
पडलो आम्ही आज जरी, रडणार नाही खास तरी
खूप खूप मज्जा करू या, खेळायचं हाय आज… ॥।४॥
दिवे लागता खेळ थांबवू, घरात जाऊ हातपाय धुवू
वंदन करुनी देवाला, वडिलांना अन् आईला
सद्बुद्धी आपण मागू या, खेळायचं हाय आज… ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP