भावगंगा - होऊ द्या यज्ञ सतत चहुकडे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
होऊ द्या यज्ञ सतत चहुकडे
वैदिकी झडती जगिं चौघडे ॥धृ॥
भेद पळाले मनामनातिल
सख्य आळवी मतिची कोकिळ
शिकविते संस्काराचे धडे ॥१॥
विश्व व्यापिले भ्रातृत्वाने
प्रेमळ प्रभुच्या वात्सल्याने
ऐक्यता मानव्या सांपडे ॥२॥
उभी राहिली ॠषि-पुण्याई
विचार-मंथन करि नवलाई
जीवाचे तुटे गहन सांकडे ॥३॥
भाषा मिटली भाव पुष्टले
वैरागी संसारी भेटले
हेच ते पुरातनी घोंगडे ॥४॥
वृक्षामधला देव पाहिला
श्रमशक्तीचा रंग बदलला
कलांचे संगम सगळीकडे ॥५॥
हरिपूजन मैत्रीस निमंत्रण
संघशक्तिने तुटते कुंपण
विचारी पाउल पडते पुढे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP