भावगंगा - दिवे पहा हे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
दिवे पहा हे पहा दिवाळीतले दिवे पहा ॥धृ॥
एक भेटता दुसरा पेटे प्रेमाचे हे रुप गोमटे
पंगत धरुनि उभे पहा दिवे पहा हे दिवे पहा ॥१॥
बसल्या जागेवरती डुलती आनंदाची प्रभा उळती
हसती किती निर्व्याज पहा दिवे पहा हे दिवे पहा ॥२॥
उजेड देती स्वत:स जाळुन दुसऱ्यांसाठी त्यांचे जीवन
त्यागमयी संतुष्ट महा दिवे पहा हे दिवे पहा ॥३॥
चिमुकले परी किती मातब्बर अंधाराचे काळ, धुरंधर
म्हणती प्रेमानेच रहा दिवे पहा हे दिवे पहा ॥४॥
ऐक्य हेच मानिती कमाई शिस्तीचे हे मुक्त शिपाई
कर्तव्याचे बादशहा दिवे पहा हे दिवे पहा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP