मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
का बनसी बेभान तरुणा !

भावगंगा - का बनसी बेभान तरुणा !

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


का बनसी बेभान तरुणा ! का बनसी बेभान
तव आशेवर जगतो बघ रे संस्कृतिचा सन्मान ॥धृ०॥
खावे, प्यावे, मजा करावी हेच का तव ध्यान
का जगसी रे असा अगतिका ! जीवन पशू-समान ॥१॥
दुर्लभ मानव-जन्म मिळाला त्याचे तुज ना भान
विसरलास तू लाभ अलौकिक; मन बुद्धि नि प्राण ॥२॥
एक झुळुक येता सिद्धिची कैफ पकडी तव ज्ञान
तुझी शक्ती केवढी, कशाला धरसी रे अभिमान ॥३॥
भोगांनी तुज भ्रष्टविले रे घालविले अवसान
स्वार्थाने हैराण, बघ जरा; संस्कृति तव वैराण ॥४॥
वाढव ! वाढव !! शान तू गड्या ! जग जाईल तव गान
ओवाळिल संस्कृती तुजवरुनी अपुले पंचप्राण ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP