भावगंगा - भ्रमात गुंतुनि
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
भ्रमात गुंतुनि नकोस जाऊ, दु:खाची ती खाण
अंतरिच्या आत्म्यास ओळखी अर्पुनि अपुले प्राण ॥धृ॥
व्यर्थ नको अभिमान धनाचा
मान नको तो मोह मनाचा
एकच केवळ प्रभुनामाचे
मना लावि तू ध्यान ॥१॥
जीवन अपुले बहुमोलाचे
व्यर्थ गमावू नकोस साचे
या जन्मीं या देहीं प्रभूचे
मना लावि तू ध्यान ॥२॥
दुर्गुण सोडुनि पवित्र होसी
अधिष्ठान मग प्रभु पाठीशी
निर्भयतेचे स्वतंत्रतेचे
मना लावि तू ध्यान ॥३॥
स्वाध्यायाचे तप आचरुनी
भक्तीच्याही शिखरी बैसुनी
मुक्तीच्या परमानंदाचे
मना लावि तू ध्यान ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP