भावगंगा - चला चला हो, चला महापुरुष चालले
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
चला चला हो, चला महापुरुष चालले
त्यांच्या पायांनी मार्ग साकारले ॥धृ॥
कर्तृत्वाचे पहा पहाड उठले, सरिता होऊन तर भाव वितळले,
झाली ऐक्याने मोठी मोठी देवळे ॥१॥
तपात उतरली उद्धारक शक्ती, आकर्षक बनली दूरची ही मुक्ती
लागले मनाला वेड तिचे लागले ॥२॥
ज्ञान-भक्ती-कर्मावर माया हो जडली, प्रीती निरागस अंतरात भरली
आले अचानक समाधान आले ॥३॥
वारा घेऊन गेला सगळा सुगंध, कीर्तीचे नव-नवीन उठले तरंग
भिडले हृदयास जाऊन ते भिडले ॥४॥
थवे जनांचे भवताली जमले, नित्यनेमे सारे आकारून आले
नेमके विभाजन कामांचे झाले ॥५॥
तीर्थाचे भाव पुन्हा जागू लागले, जुन्या विचारांस अंकुर फुटले
उठतिल सगळ्या ॠषींची आता कुळे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP