भावगंगा - अंतिम कामना
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
अंध भक्ती, प्रेम स्वार्थी, लोक सारे पळती
फक्त पापे धूत आहे मूळ गंगा वाहती
मीच माझ्या संस्कृतीची का करु अवहेलना ॥१॥
व्यर्थ आता का ठरावे ? भारती हे जन्मणे
दिव्यता अन् भव्यता ही विसरली का जन-मने ?
जाग यावी नरतनूतिल सुप्त त्या पंचानना ॥२॥
क्षुद्रता ही नष्ट व्हावी योगियांच्या दर्शने
तिमिर आतिल विरुन जावा पेटता नीरांजने
देह व्हावा अमृतलायम् नित्य ही आराधना ॥३॥
रुदन त्यागी संस्कृतीचे श्वापदनांना ना तमा
काय त्यांना ज्ञात इथल्या वेदनेचा मधुरिमा
नित्य अमुचे नमन व्हावे पांडुरंगी ॠषि-मना ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP