भावगंगा - नवा धडा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जीवन ही रम्य लीला, निसर्गाची खेळ-क्रीडा
सांगावया दादा ! तुम्ही देता का हा नवा धडा? ॥धृ॥
भक्ती जीवनात हवी, निसर्ग तो प्रेमवेडा
मानव्याच्या उद्धाराचा मार्ग सांगे तेढामेढा
दीप जाहला रात्रीला सुखेनैव मार्ग झाला
आम्ही झालो बिनधोक, रक्षू गीता नि जिव्हाळा ॥१॥
तुम्ही दाखविले तारे, तुम्ही दाखविली भूमी
सारी सृष्टी, मानव्याला रंगविले छान, नामी !
अमृतालयाला दिली संस्कारांची ओढ, जोड
योगेश्वर-कृषी केली कर्मयोग बिनतोड ॥२॥
तीर्थयात्रा झाली मोठी, भावनांच्या संगमाने
जुन्या-नव्याच्या टोकांना तुम्ही बांधिल प्रेमाने
यज्ञ विचारांचे वारू धावतात चारी दिशा
पृथ्वी स्वर्गाला भेटली फुलता मानवी आशा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP