भावगंगा - कर्मयोगी जीवांची सेवा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
कर्मयोगी जीवांची सेवा झाली चंद्रभागा
भीमा झाली चंद्रभागा ॥धृ॥
तपोनिधीचे तप पाझरले कर्मयोग वर्षुनि जळ भरले
भक्तांच्या भक्तीची वाहे मंगलमय गंगा ॥१॥
ज्ञान भक्ती कर्माचा पुंडलिकाने मळा फुलविला
नेत्र तृप्तले जगदीशाचे पाहुनी त्या रंगा ॥२॥
योगेश्वर परि मुका राहिला हात कटेवरि उभा ठाकला
शब्द न वदता सर्व पाहतो उधळित रसरंगा ॥३॥
एक वेळ न्हाऊ भीमेमधि एक पाहू विठ्ठल नयनामधि
वाहूनी जीवन चरणी आणू हृदयी पांडुरंगा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP