भावगंगा - घ्या हो घ्या हो तुम्ही योगेश्वर
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
घ्या हो घ्या हो तुम्ही योगेश्वर
प्रशांत निर्मळ अति तेजोमय वास करी जो हृदयीं ॥धृ॥
सागरा मिळे जी अथांगता पर्वता मिळे अचल दृढता
पुष्पामधला सुगंध हा तर त्याच्या शक्तीपायी ॥१॥
देह मानवी दिला जीवाला परी त्यात का येऊनी बसला
होऊ शकीन मी करुन दाखवीन ऐसा निश्चय पाही ॥२॥
गीता दिधली अर्जुनास त्यां "दादा" दिधले कलियुगात ह्या
सगूण झाला निर्गुणामधुनी दर्शन आम्हा देई ॥३॥
बहुश्रुत मग झालो आम्ही जन कृतज्ञतेने झालो पावन
निमीत्त झालों ऋषीमार्गास्तव झालो स्वाध्यायी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP