भावगंगा - परिवार भावना
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
सांगाल का कोणी कुठे परिवार असला पाहिला
जो प्रभूचे नाव घेऊन नित्य फिरता राहिला ॥धृ॥
शपथ ना घेई कुणी, माळा नसे कंठी गळा
बांधुनी घरची शिदोरी लंघतो गिरी पांगळा
करितसे संसार परि हा त्यात राहे मोकळा ॥१॥
वर्गणी ना शुल्क येथे, ना पदाची लालसा
मान सन्मानी मुका जो, वैभवी जो पद्मसा
दाविला ज्यांनी जगाला अमृताचा सोहळा ॥२॥
वाद ना तक्रार ना, दीनता ना याचना
भक्तिफेरी मानिती जे योग, सिद्धी साधना
देव ज्यांच्या सुकृतातून ह्या जगी विस्तारला ॥३॥
आठवा होतो कसे? झालो कसे? कोणामुळे?
कोण आला देव दारी? ओढ ही कोणामुळे?
स्वार्थाविना हिंडे जगी हा पांडुरंगी काफिला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP