भावगंगा - सज्ज व्हा !
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
सज्ज व्हा ! सज्ज व्हा चला पुढे संस्कृतीची हाक रे
पांडुरंग दादाचा दिन (आज)
मनुष्य गौरव दिन मनुष्य गौरव दिन ॥धृ॥
पंचरंगी क्रांतीने ‘आर्य’ एक जोडले
जाती धर्म भेदभाव सारे त्याने विरले
एक रक्त बनविणारे भाव त्याने फुलवीले ॥१॥
पंचरंगी क्रांतीची मत्स्यगंधा आगळी
सागरपुत्रांना ही देवपूजा आगळी
चाकरी नि मालकी घटना ही आगळी ॥२॥
पंचरंगी क्रांतीची योगेश्वरकृषी न्यारी
भूमीपुत्र शेतकरी सच्चे पुजारी
निपुणता अर्पुनी शेती ही नांगरी ॥३॥
पंचरंगी क्रांती सांगे अमृतालयम्
दीन दुबळा राहीना देवाला वंदनम्
भेद भाव दूर पळे ऐक्याचे धाम ॥४॥
पंचरंगी क्रांती सांगे तीर्थयात्रा ही खरी
गीतेचा संदेश जाई घरोघरी
मागणी नसे कधी निरपेक्ष भाव उरी ॥५॥
दादांच्या वचनांनी पाप सारे विरले
मानवमात्रातील गुण खरे खुलविले
देण्या वचन दादा वीर उभे ठाकले ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP