भावगंगा - गोष्ट सांगतो मांजरिची
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
ऐका ऐका गमतीची
गोष्ट सांगतो मांजरिची ॥धृ॥
हसाल तुम्ही
तशीच तुम्ही
तशीच नामी
येईल कामीं
नटली सजली बोधाची ॥१॥
एके दिवशी
मनी मावशी
होती उपाशी
भूक लागली जोराची ॥२॥
तिने पाहिली
दूध तपेली
हळूच आली
घाई झाली प्यायची ॥३॥
होते मिटले
दोन्ही डोळे
इवले इवले
आवड तिजला सायीची ॥४॥
परंतु सगळे
अवचित घडले
फटके पडले
नजर तापली आईची ॥५॥
मला वाटले
तिला मारिले
का हे घडले
चूक कोठली मांजरिची ॥६॥
ध्यानी आले
श्र्लोक न म्हटले
नमन न केले
झाली शिक्षा तिज त्याची ॥७॥
जेऊ बसावे
वाढू द्यावे
श्र्लोक म्हणावे
ती सेवा मग देवाची ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP