भावगंगा - धरित्री-माता नित्य उदार
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
आदि अन्ती मधे सर्वदा तीच एक आधार
धारित्री-माता नित्य उदार ॥धृ॥
पापी-जनांची लाथ झेलते
पडता, झडता परी रक्षिते
साकारित वात्सल्य नांदते
प्रभूचा साक्षात्कार ॥१॥
पुण्यवान पद स्पर्शता कधी
खुशीत लागे तिला समाधी
ती मोदाची मिळता संधी
अचल बघावी बहार ॥२॥
तीक्ष्ण आयुधें ऊर फाडिती
प्रहार निर्घृण अनंत पडती
मतलबी मानव शीर फोडतो
परि देते शीर फोडतो
परि देते पयधार ॥३॥
क्षमाशील, अपराध सोसते
गुरुत्व नकलत धडा शिकविते
प्रेम-प्रविण सकलांस जोडते
एक तत्त्व ‘स्वीकार’ ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP