मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
तू राम तू घन:श्याम

भावगंगा - तू राम तू घन:श्याम

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


तुझे मी काय करू गुणगान    तुझे मी काय करू घन:श्याम ॥धृ॥
नव निर्माता ब्रह्मदेव तू        पालक, पोषक कमलेश्वर तू
संकट नाशक शिव तव नाम    तू तर राम तू घन:श्याम ॥१॥
कोणी तुजला मानव म्हणती    संत-ॠषींची पदवी देती
ईश्वर तू हृदयातिल राम        तू तर राम तू घन:श्याम ॥२॥
प्रेम-रूप तव जग न ओळखी    कार्य कळे तो उठवि पालखी
भक्तांचे तू अंतिम धाम        तू तर राम तू घन:श्याम ॥३॥
तव सहवासे लाभ शांतीचा        विसर मनाला निज दु:खाचा
तू सकलांचा आत्माराम        तू तर राम तू घन:श्याम ॥४॥
याद सदा तव उपकाराची        पूजा करतो पदकमलांची
वसो मुखीं तव एकच नाम    तू तर राम तू घन:श्याम ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP