भावगंगा - मृत्यूचे एक रूप जाण
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
मृत्यूचे एक रूप जाण
मानवा! मृत्यूचे एक रूप जाण ॥धृ॥
वस्त्र बदलणे मृत्यूचे रूप रे
उंच स्वराने गीता पुकारे
नको करू मन दु:खाने बावरे
कर तू प्रभूचे ध्यान ॥१॥
मृत्यू न शेवट, क्षणभर विसावा
थकता काया आश्रय घ्यावा
शिवासंगती जीव रमवावा
पुढले मन प्रस्थान ॥२॥
मृत्यू अटळ रे भीतीला टाक तू
प्रेम प्रीतीने भगवंत बांध तू
पर्याय सोपा मनात आण तू
एकच तुज संधान ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP