भावगंगा - मानाचा मुजरा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
थयथयत्या युवकांचा ्घ्या हा मानाचा मुजरा
दादा ! तुम्ही आम्हा दाविला जीवनमार्ग खरा ॥धृ॥
कर्तव्याला विसरुन आम्ही दिङ्मूढ झालो होतो
स्वार्थान्धांच्या भुलथापांना नकळत फसलो होतो
जागृत करूनी युवाशक्तीला निश्र्चित केली परा ॥१॥
देव-धर्म अन् संस्कृतिवरती होती साचली धूळ
अलगद उकलुनी पुढे ठेविले ॠषी-मुनींचे कूळ
शेंदूर फासुनि दिव्यत्वाचा देव बनविले नरा ॥२॥
ध्येय मिळाले, श्रेयही कळले पुलकित झाले कर्म
सार्थक झाले ह्या जन्माचे कळले जीवन मर्म
भाव, भक्ती अन् कृतीभक्तीचा अखंड वाहे झरा ॥३॥
कृतिही कळली, गती मिळाली, दौड झाली सुरू
प्रेमच देऊनी मानवतेचा जीर्णोद्धारही करू
प्रयोग-पुष्पे अर्पण करूनी तुम्ही सजविली धरा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2023
TOP