भावगंगा - चरणी वाहुनि जीवन
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
चरणी वाहुनि जीवन सारे साधन मी बनले
हरीचे साधन मी बनले ॥धृ॥
माझे मीपण टाकुनि दिधले
श्रद्धेला फुलवित गहिवरले
प्रेमाने गंधित रसरसले
लोचन पाझरले ॥१॥
अंतर नाही, बाहेर नाही
एक विसावा प्रभुला गेहीं
अंकित काही माझे नुरले
पोकळ मी झाले ॥२॥
भाव आपुले हरी बोलतो
तुरा तयांचा शिरी डोलतो
किमया त्याची मला न कळली
प्रेम कसे जडले ॥३॥
काही न माझे सारे हरिचे
भार शिरावर माझ्या प्रभुचे
त्यास गवसले सुख मोहरले
नवथर सुर नटले ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP