भावगंगा - भक्तीफेरी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
बांधूनिया प्रेम-शिदोरी, विचार गीतेचा करीं
जातो आम्ही घरोघरी, हीच अमुची भक्तीफेरी ॥धृ॥
नाही उपदेशक आव, नाही मार्गदर्शक भाव
रक्त बनविणारा एक, नाते आम्हा हेच ठावं
भावाला भावाने भेटत भ्रातृभाव जपतो उरीं ॥१॥
समाज सुधारक नाही, नाही आम्ही उद्धारक
भक्तीची भूमिका आई संस्कृतीची हाक
सर्वधर्म स्वीकारुनी, ठेवितो प्रभुला शिरी ॥२॥
प्रचारार्थ फिरत नाही, प्रसारार्थ हिंडत नाही
काही नाही मागत आम्ही देत नाही काही
वचने गीतेची सांगत, घेऊन फिरतो हरी ॥३॥
देणे-घेणे बंद आहे, आहे आनंदी-आनंद
स्वाध्यायींच्या संगे नाचे गोविंद-मुकुंद
विश्व आर्य होते आहे, पांडुरंग माया सारी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP