भावगंगा - कृतघ्न होऊ नको
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
कृतघ्न होऊ नको मानवा शब्दाला तू जाग
तुझ्या कृतीने लावु नको रे मानव्याला आग ॥धृ॥
तुझ्या सुखास्तव सृष्टी सजविली
विविध रंग रूपाने भरली
कला अतुल नवनविन विनटली
पाहुन कर अनुराग ॥१॥
चतकोराची याद न विसरे
श्वान पशु परि प्रामाणिक रे
दिले ज्ञान तुज प्रभुने सारे
का न फेडिसी पांग ॥२॥
नाकाने तुज सुगंध कळतो
रसस्वाद जीभेने मिळतो
डोळा सुंदरता तुज कथितो
काय उणे मग सांग ॥३॥
ओज, तेज तुज रवि-शशि देती
पाऊस अमृतधारा झरती
विनाकामना सेवा करती
प्रेषक त्यांचा जाण ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP