भावगंगा - भक्ती सुगम बहु
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
भक्ती सुगम बहु गीता समजावते
चपल मन प्रभू-चरणीं तू बांध ते ॥धृ॥
संकल्प सान, परी प्रभूवर टाक तू
निर्णय त्याचे ते तुझेच मान तू
मन, मती ज्याची समर्पी तू त्याते ॥१॥
संसार-सागर तर दुस्तर भारी
ईशकृपेवाचून कोण तेथे तारी
सुकाणू आशेचे ठेव प्रभू-हाति ते ॥२॥
ईशकामामध्ये आदेश नि वेग
आसुरी वृत्तीचा द्वेष विराग
राख रे जीवन तू भजनी तरंगते ॥३॥
चिन्तनशील मुनी ब्रह्मर्षी बन तू
विनट वैभवे राजर्षी शूर तू
देवर्षी भावाने प्रीती उमलते ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2023
TOP