भावगंगा - एकच द्या वरदान
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
एकच द्या वरदान, देवा एकच द्या वरदान ॥धृ॥
शुभश्रवणाने पवित्र व्हावे, सदैव अमुचे कान
साधू-संतांच्या संगाने, घडो बुद्धिला स्नान
देवा एकच द्या वरदान ॥१॥
शुभकथनातुनि सदा वाहु दे, तुझेच मंगल गान
घराघरातुनि आम्हा नेऊ दे, तुझेच गीता ज्ञान
देवा एकच द्या वरदान ॥२॥
शुभ-चिंतननिही सदा राहु दे, मन अमुचे रे दंग
चिंतनातुनी त्या उठू दे, हृदयी भाव तरंग
देवा एकच द्या वरदान ॥३॥
शुभकर्मास्तव देह झिजो हा, पवित्र जीवन करुन
तव कार्यास्तव निमित्त बनु दे, अर्पुनि तन-मन-धन
देवा एकच द्या वरदान ॥४॥
शुभदर्शनि त्या सदा दिसू दे, मंगल तव ती मूर्ती
चराचरातही तूं वसतोसी, दे आम्हा अनुभूती
देवा एकच द्या वरदान ॥५॥
पूज्य दादा देती आम्हासी, स्वाध्यायाचा मंत्र
अखंड राहो आम्हावरती, त्यांचे प्रेमळ छत्र
देवा एकच द्या वरदान ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP