मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
श्रद्धेने बुद्धीने समजून घे

भावगंगा - श्रद्धेने बुद्धीने समजून घे

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


श्रद्धेने बुद्धीने समजून घे
आतील प्रभुस्पर्श जाणून घे ॥धृ॥
जीभ ओली राहते का ? ठेवीतो कोण ?
खातो ते पचते का ? पचवीतो कोण ?
प्रेमाचा प्रवाह समजून घे ॥१॥
झोप दिली कोणी ? अन्‌ जागवितो कोण ?
भूक देऊनी सकलां पोषीतो कोण ?
पूजारी कोण खरा शोधून घे ॥२॥
लाल रक्त का बनते? बनवीतो कोण ?
शर्करा प्रमाण, लोह ठरवीतो कोण ?
अभिषेक देवाचा समजून घे ॥३॥
बत्तीस दातात जीभ मोकळी का ?
पंचेंद्रियांना विषयांची ओढ का ?
रचनेचे कौशल्य पिऊन घे ॥४॥
वासना विकार यास नाचवितो कोण
उनाड मनास आवरतो कोण ?
आतील शिवास जिंकून घे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP