भावगंगा - अमृतालयम्एक दृश्य
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
हरि ! तुझे घरकुल किति रे छान ! ॥धृ॥
खळखळ ओढा वाहे बाजूस
गीता पिउनी झाला तुज वश
तुझ्याच दारी गोप खेळतो
धरुन तुझा अभिमान ॥१॥
मस्तीत गाता तो तव अंगणी
त्या नादाने डुलति वृक्षमुनी
ते पाहुनी तू हंससि खळाळुनि
गोकुळचा भगवान ॥२॥
दिनभर पक्षी किलबिल करती
निजती तरुवर येता रात्री
निर्भय असती तुझ्या संगती
चरणी धरती ध्यान ॥३॥
स्वाध्यायींना तुझा आसरा
तुझ्या प्रीतीचा त्यांस निवारा
खुशीत असती तुझ्या घरकुलीं
नुरते कसले भान ॥४॥
ह्या सौख्याचा मी अभिलाषी
अमृतालयम् अभिनव काशी
पाहुनी ती मी दंगच देतो !
कर तू करुणा-दान ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP