भावगंगा - मंदिर
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जा सांज सकाळी मंदिरात प्रभुजवळी ॥धृ॥
लाभती तुज सद्विचार
नवजीवन-दुग्धधार,
बंधु-भगिनी मिलनातुर
गोड सुखें ही सगळी; मंदिरात प्रभुजवळी ॥१॥
शान्ती होई नित प्रसाद
संस्कृतिची ऐक साद
सोड, सोड मुसमुसली; मंदिरात प्रभुजवळी ॥२॥
ज्ञानास्तव भजन तिथे
कर्मप्रवण मन बनते
भक्ती, प्रेम मोहरते
फुलत विकासाचि कळी; मंदिरात प्रभुजवळी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP