मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
आली हो होळी

भावगंगा - आली हो होळी

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


आली हो होळी, आली हो होळी
आली, आली हुताशनि आली
धगधगती आशावाली ॥धृ॥
या, या सारे मानव-गण हो
प्रज्वलीत ज्वालांचा जय हो
गर्जत जाळा राग द्वेष अन्‌
करा भाव बलशाली ॥१॥
बनवा मन-मन हेमकांतिमय
रुचेल प्रभुला बनेल तन्मय
पावन मंगल जीवन सगळे
भावातुर जयशाली ॥२॥
आणा सगळा मान, भेद वा
अहंभाव फेकुनी चेतवा
प्रसन्न होइल त्या ज्वाळांतूनि
वत्सल करुणा-काली ॥३॥
दृष्टि-दोष इंधन होळीचे
गुणप्रदर्शन कार्य तियेचे
श्रद्धेला पोसते, जाळते
तर्ककुतर्का होळी ॥४॥
भोग-याचना टाका आगित
होउ नका त्यागाचे अंकित
त्याग भोग हो नित्य उबारा
संयम ज्याचा वाली ॥५॥
पाप जळता प्रसन्न होळी
भरते पुण्याची नित झोळी
प्रभु-भेटीची मिळते पोषक
रुचिरा दुर्लभ पोळी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 06, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP