भावगंगा - प्रभुसाठी करू थोडे काम
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
प्रभुसाठी करू थोडे काम गीता गाऊ घेऊ हरिनाम ॥धृ॥
साधुया उच्च जीवन हो आनंद, सुखाचे बन हो
चैतन्य आणि आराम, गीता गाऊ घेऊ हरिनाम ॥१॥
जागवू भक्तिची शक्ती पेटवू ज्ञानाची ज्योती
कमात वसवुया राम, गीता गाऊ घेऊ हरिनाम ॥३॥
ऐक्यात मुंगी जरी मोठी शौर्यात सिंह जगजेठी
परि भक्ती जिवा निजाधाम, गीता गाऊ घेऊ हरिनाम ॥४॥
कळवळा संत बहु करिती उपदेश आगळा देती
तो ऐकुनि करुया नेम, गीता गाऊ घेऊ हरिनाम ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2023
TOP