भावगंगा - कृष्ण कन्हैया गाऊया
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
या बाळांनो या रे या
कृष्ण कन्हैया गाऊया ॥धृ॥
गोकुळातला बालवीर हा
ऐटदार किती ! श्याम घन अहा !
माथि मोर पिस शोभते पहा
नेता त्याला निवडूया ॥१॥
सुरेल गाते त्याची मुरली
गोपगोपिंची सुधबुध हरली
गाई-वासरे भवती बसली
एक निराळी ती दुनिया ॥२॥
यमुनाकाठी या कृष्णाचे
प्रेम हरपले बहुमोलाचे
संत मुखातून त्या प्रेमाचे
यशोगान नित ऐकूया ॥३॥
जगताची तो आदिम शक्ती
शोधित फिरतो विशुद्ध भक्ती
प्रेम पाजितो देतो मुक्ती
कुणा ना कळे ती किमया ॥४॥
आपण त्याचे करुया पूजन
श्रद्धेने नित नेमे वंदन
त्याच्या गीतेचे करु गायन
निज शक्तीला वाढवुया ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP