मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
स्वाध्यायाने दादा, मी रमलो

भावगंगा - स्वाध्यायाने दादा, मी रमलो

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


स्वाध्यायाने दादा, मी रमलो
पद-स्पर्शाने पावन बसलो, पुरता विरघळलो ॥धृ॥
पुष्प गुलाबी होते हातीं
भाव-बहराने भरली छाती, चरणी मी झुकलो ॥१॥
मृदुतर वाणी मधुर स्वराची
ऐकिलि भाषा सुख-दु:खाची, मंत्रमुग्ध झालो ॥२॥
शपथ वाहिली गीतेसाठी,
उरले आयू संस्कृतिसाठी; अर्जुन जणु सजलो ॥३॥
होती, नव्हती शंका फिटली
भोगांनी मम काया विटली, मधुरही मी बनलो ॥४॥
घेउन भगवद्‌गीता हातीं
मिळविन तुमची अमोल प्रीती, वचनबद्ध जाहलो ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP