मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
देवासाठी जन्म आपुला

भावगंगा - देवासाठी जन्म आपुला

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


देवासाठी जन्म आपुला मुखात त्याचे गान,
देवासाठी झिजो अखंडित चंदन होउन प्राण ॥धृ॥
तोच आमुची आई, आम्ही प्राणिजात लेकरें
पुढती मागे उभा राहुनी सांभाळी पाखरें
पंखाखाली त्याच्या आम्ही असतो नित्य महान
देवासाठी झिजो अखंडित चंदन होउन प्राण ॥१॥
तो सागर अन्‌ आम्ही बिन्दू, त्याच सागराचे
अखंड मिळुनी जीवन जगुया प्रेमळ, भक्तीचे
तोच आमुची शक्ती आणि तोच असे अभिमान
देवासाठी झिजो अखंडित चंदन होउन प्राण ॥२॥
अगणित संख्येने जरि आम्ही, एकच परि अंती
त्या देवाचे अंश म्हणूनी तोच आम्ही जगतीं
त्याच्यापरि असणे हा एकच आहे अमुचा मान
देवासाठी झिजो अखंडित चंदन होउन प्राण ॥३॥
कणाकणाने वाढत जावो मनात प्रभुची प्रीत
क्षणाक्षणाने बहरुन येवो मनात प्रभुची रीत
प्रभुमय सगळे, प्रभुमय जीवन, प्रभुचे लागो ध्यान
देवासाठी झिजो अखंडित चंदन होउन प्राण ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP