भावगंगा - निर्मळ जीवन बनवूया
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
निर्मळ विचार, निर्मळ आचार, निर्मळ जीवन बनवूया
तीर्थयात्रेला जाऊया, तीर्थयात्रेला जाऊया ॥धृ॥
पुरुषार्थाच्या स्फूर्तीचे स्थान अलौकिक तीर्थाचे
महानतेला पाहूया निर्मळ जीवन बनवूया ॥१॥
बांधव जोडू प्रेमाचे भ्रातृत्वाच्या नात्याचे
त्यांना सोबत घेऊया निर्मळ जीवन बनवूया ॥२॥
तरू-वनचरें-पक्ष्यांची भेट, प्रभूच्या किमयेची
भूगोलाला समजूया निर्मळ जीवन बनवूया ॥३॥
यात्रा मोठी तीर्थांची पावन भूमी संतांची
तापस् ॠषिंना समजूया निर्मळ जीवन बनवूया ॥४॥
गौरव-गाथा देवांची भक्ती कळते भक्तांची
बोध त्यांतुनी घेऊया निर्मळ जीवन बनवूया ॥५॥
तनूसवे मन धुवुनीया पुढले सार्थक साधूया
स्वच्छ आतुनी होऊया निर्मळ जीवन बनवूया ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP