भावगंगा - स्वाध्यायी माझे बंधो !
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
स्वाध्यायी माझे बंधो ! तू गाई नित्य गीता
समजावुनी तू घेई हृदयातल्या अनंता ॥धृ॥
देवत्व लोभवीते असुरत्व मोहवीते
द्वंद्वात त्या युगांच्या मानव्य गिरकी घेते
त्या मलिन अस्मितेला उपयोगी एक गीता ॥१॥
हृदयात उर्मी उठती जग शान्तिने भरावे
प्रेमाविना न तेथे कुणि मोकळे फिरावे
त्या श्रेष्ठ जीवनाच्या गुह्यास वदे गीता ॥२॥
कर्तव्य का करावे, हक्कास का जपावे
दोघांतुनी कुणाला कधि का कसे स्मरावे
त्या जटिल समस्यांची सांगेल उकल गीता ॥३॥
भावात भेद घुसतो बुद्धीत क्रांति रिघते
मंथन मनात होता चैतन्य नष्ट होते
विकलांग त्या जीवांचा आधार एक गीता ॥४॥
नाती निराश करिती पशु-पक्षि-मानवांची
हरवून जीव बसतो आशा, मजा सुखाची
त्या कठिण काळी बनते आईसमान गीता ॥५॥
तुज वाटतो कळावा भगवान, भाव, धर्म
जाणून मर्म त्यांचे रंगेल नित्य कर्म
‘मग नमन कर प्रभूला’ मृदु बोलते ती गीता ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2023
TOP