भावगंगा - आम्ही खेडूत खेडूत रे !
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
आम्ही खेडूत खेडूत रे
देवा! तुझ्याच आज्ञेत (राज्यात) रे ॥धृ॥
शेतामध्ये जाऊ तुझी कृपा पाहू
फुले, फळे गाती नाम रे ॥१॥
आमच्या हातीं नांगर मुखीं तुझा गजर
पांडुरंगी दृढ भाव रे ॥२॥
पिकती हिरे मोती खरी तुझी प्रीती
करुणा वाहे खळाळून रे ॥३॥
आम्ही साधे राहू तुला मध्ये घेऊ
प्रेम पुरे तुझे एक रे ॥४॥
खाऊ कांदा भाकर होऊ तुझे चाकर
पिकवू भक्तिमळा छान रे ॥५॥
काम तुझे करू पोट आमचु भरू
तुझी नवलाई गाऊन रे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP